महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांची ग्वाही : स्वामिनाथन आयोगाने सुचविलेल्या शिफारशींचा सरकारने केला स्वीकार
फैजपूर- महसूलमंत्री चंद्रकात पाटील म्हणाले की, शेतकर्यांनी परंपरागत शेती मध्ये अडकून न पडता पिकांमध्ये बदल करत उत्तम शेती कशी करता येईल याचा विचार करावा. यावेळी त्यांनी शेतकर्यांना दुप्पट उत्त्पन्न कसे होईल याचा विचार सरकार करत असतांना या उत्पादनाल भाव सुध्दा मिळवून देण्यासाठी सरकर प्रयत्नशीर आहे त्यासाठी स्वामिनाथन आयोगाने सुचविलेल्या शिफारशीचा स्वीकार सरकारने केला आहे. असे सांगत केळी व कापूस याच्या नुकसान भरपाई साठी शासन बांधील आहे. कर्पा रोगाचा आवश्यक निधी उपलब्ध करून देवू. या सरकारने 45 लाख शेतकर्यांना कर्जमाफी दिली दर 55 लाख शेतकर्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचेही आवर्जून सांगितले. फैजपूर येथील अटल महाकृषी कार्यशाळेत त्यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.