केळी घड म्हशीला का टाकला ? जाब विचारताच दाम्पत्यास मारहाण

Beating couple in Kusumba : Crime against one रावेर : तालुक्यातील कुसूंबा येथे दाम्पत्यास शेतातील केळी घड म्हशीला का टाकले? याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आली तर तिच्या पतीला शिविगाळ करण्यात आल्याची घटना बुधवार, 24 रोजी सायंकाळी घडली.

दाम्पत्याला मारहाण करीत केली शिविगाळ
तक्रारदार चंद्रभागा वसंत महाजन (62, कुसुंबा बु.॥) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी महेश वसंत महाजन यांनी तक्रारदार यांच्या शेतातील पाच ते सात केळी घड म्हशींना टाकल्याने त्याचा जाब विचारल असता वसंत महाजन यांना शिविगाळ करून दमबाजी करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तर चंद्रभागा महाजन यांच्या पाठीवर लोखंडी सळईने मारहाण केली. नाईक जगदीश पाटील करीत आहेत.