यावल- यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड होत असलीतरी बोर्डाने जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव देऊन व्यापार्यांनी मनमानी चालवल्याचा प्रकार सुरू असल्याने उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बोर्ड भावापेक्षा 400 ते 500 रुपये कमी दराने केळीची खरेदी सुरू आहे. यावल बाजार समितीचे व्यापार्यांवर नियंत्रण नसल्यामुळे व्यापार्यांचे चांगलेच फावले आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्यांना दररोज मेसेजद्वारे केळी भाव कळवले मात्र त्या भावात केळी खरेदी होत आहे वा नाही या संदर्भात कुठलीही दखल घेत नसल्याचा आरोप केळी उत्पादक करीत आहेत. व्यापार्यांच्या मनमानी कारभाराला आवर घालावा व शेतकर्यांसह केळी उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.