ढाका। जगातील क्रिकेट ईतिहासात आजपर्यंत कधीच घडले नसले असे आश्चार्या घडले आहे. अवघ्या चार चेडूत 89 धावा काढल्या गेल्या व प्रतिस्पर्धी संघाने विजय साजरा केला.तो आगळा विक्रम बांगलादेशातील ढाका क्रिकेट लीगमधल्या सामन्यात घडला आहे. एका गोलंदाजाने एक ओव्हर 84 चेडूची टाकली. ढाका लीगमधल्या या सामन्यात एका संघाने केवळ चार चेंडूंमध्येच 89 धावांची नोंद करून चक्क विजयही मिळवला. विश्वास बसत नाहीय ना, पण हे आहे.क्रिकेट ईतिहासात याची नोंद झाली असून आजपर्यंत कोणत्याही संघातील गोलंदाजने 84 चेडूची ओव्हार टाकली नव्हती.मात्र एक्झिम क्रिकेटर्सच्या डावात लालमाठिया क्लबच्या सुजान मेहमूद या गोलंदाजाने तो विक्रम केला आहे. तो आपल्या संघाचा पराभूत होण्यास कारणीभूत ठरला.
फलंदाज फक्त 4 चेडू खेळला
ढाका लीगमधल्या दुसर्या डिव्हिजनच्या एका सामन्यात लालमाठिया क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करून 14 षटकांत सर्व बाद 88 धावांची मजल मारली होती.त्यानंतर प्रतिस्पर्धी एक्झिम क्रिकेटर्सच्या डावात लालमाठिया क्लबच्या सुजान मेहमूद या गोलंदाजाने पहिल्याच षटकात चक्क 80 वाईड चेंडू टाकले. त्या 80 वाईड चेंडूंच्या 80 धावा एक्झिम क्रिकेटर्सच्या खात्यात जमा झाल्या.पण क्रिकेटच्या नियमानुसार ते चेंडू मोजण्यात आले नाहीत. मग त्या षटकातल्या केवळ चार अधिकृत चेंडूंमध्ये एक्झिम क्रिकेटर्सच्या फलंदाजांनी आणखी नऊ धावांची म्हणजे एकूण 89 धावांची नोंद केली आणि सामना जिंकला.