जळगाव। केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या वतीने इ.9 वी ते 12वी च्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वितरित करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठयपुस्तक सहयोग योजना राबविण्यात येत आहे. यात अनेक गरजू विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकाचा लाभ घेतला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची आवश्यकता आहे. त्यांनी यावर्षी होणार्या पुस्तक वितरण कार्यक्रमासाठी दि. 5 मे 2017 पर्यंत केशवस्मृती प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयात पुस्तकांसाठी अर्ज करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी 2236199 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तक सहयोग योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.