के.सी.पार्कभागातून साडेसहा हजार चोरी

0

जळगाव। शहरातील के.सी.पार्क परिसरात राहणार्‍या तरूणाच्या पँन्टच्या खिशातून अज्ञात चोरट्याने साडेसहा हजार रुपये चोरून नेले आहे. याप्रकरणी तरूणाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर सकाळी तरूणाला त्याची पँन्टही घराच्या बाहेर पडलेली मिळून आली.

के.सी.पार्क येथे राहणारा तरूणाने गुरूवारी एटीएममधून साडेसहा हजार रुपये काढल्यानंतर त्याने त्याच्या पँन्टच्या खिशात ठेवले होते. परंतू शुक्रवारी सकाळी जाग आल्यानंतर त्याला त्याची पँन्ट न मिळून आल्याने घरात शोधा-शोध केली. परंतू घराचा दार उघडाच दिसल्याने त्याने घराबाहेर जावून पाहिले असता त्याला त्यांची पँन्ट बाहेर पडलेली मिळून आली. पँन्टची तपासणी केल्यानंतर त्याला त्यात ठेवलेले साडेसहा हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तरूणाने शहर पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.