कैफ वाघाचा मृत्यू

0

पुणे । पुण्याच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील कैफ या पांढर्‍या वाघाचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. कैफला चार महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून त्याची प्रकृती खालावली होती, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे वैद्यकीय अधिकारी नवनाथ निघोट यांनी दिली.

अखेर काल दुपारी साडेचार वाजता कैफचा मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वी कैफला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून त्याला सलाईनवर ठेवण्यात आले होते. या काळात त्याची हालचाल मंदावली होती. तसेच त्याने खाणे-पिणे सोडले होते. त्यामुळे कैफची प्रकृती सातत्याने खालावत गेली. अखेर काल दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला. कैफ हा वाघ 14 वर्षांचा होता. त्याला औरंगाबादहून पुण्याला आणण्यात आले होते. कैफ हा प्राणीसंग्रहालयात येणार्‍या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण होता.