चोपडा : तालुक्यातील मंगरूळ येथे श्रीमती अ. खा.पाटील माध्य. विद्यालयात धी. शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी चे श्रद्धास्थान विधानसभेचे माजी उपसभापती कै. आचार्य गजाननराव गरुड यांची 32 वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षा वृषाली देशमुख होत्या. प्रारंभी कार्यक्रमाच्या अध्यक्ष वृषाली देशमुख, मुख्याध्यापक एम.बी.पाटील यांनी आचार्य बापूसाहेब गजानन गरुड व राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
विविध स्पर्धेंत विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार
आचार्य बापूसाहेब गरुड यांचे शैक्षणिक कार्य व गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्य याविषयी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.बी.पाटील यांनी दिली. त्यानंतर नागपूर येथील एकलव्य ज्ञानवर्धिनी बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान परीक्षेत विद्यालयात क्रमांक प्राप्त करणार्या गुणवंतांचा सत्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनी घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी आचार्य बापूसाहेब गरुड व गाडगेबाबा यांच्या जीवनकार्यावर आधारित विध्यार्थी ची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. जी.आर.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर नाईक बी. बी.तायडे यांनी अनुभव कथन केले. सूत्रसंचालन एस.पी.उदार यांनी तर आभार दीपक सूर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वसतिगृह अधिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.