कै. तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या स्मरणार्थ रक्तदान

0

महेश मंडळतर्फे मोफत हिमोग्लोबिन तपासणी

नवी सांगवी: सांगवी परिसर महेश मंडळतर्फे कै. तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या 16 व्या स्मरणार्थ विठ्ठल-रुखमाई मंदिरात रक्तदान व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 126 जणांनी रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, मनोहर ढोरे, हिरेन सोनवणे, राजेंद्र राजापूरे आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात 126 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी व हिमोग्लोबिन तपासणीसाठी केईएम हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले. हिमोग्लोबिन तपासणीचा लाभ 167 जणांनी घेतला. शिबिराच्या यशस्वितेसाठी शैलेश तोतला, गजानंद बिहाणी, दीपेश मालानी, सचिन मंत्री, निलेश मुकुंद तापड़िया, अनूप धीरन, महेश मालु यांनी सहकार्य केले.