कै.मक्कनराव चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा

0

नंदुरबार। कै.मक्कनराव (सर) शिवराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण जन्म उत्साहात साजरा करण्यात आला. माजी शिक्षण सभापती मातोश्री श्रीमती विमलताई मक्कनराव चौधरी यांचे पती व माजी नगरसेवक संजय मक्कनराव चौधरी यांचे पिताश्री कै.मक्कनराव (सर) शिवराम चौधरी यांच्या स्मरणार्थ सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्म उत्सवाचा कार्यक्रम सोमवार 14 ऑगस्टरोजी त्यांच्या राहत्या घरी चौधरी गल्ली, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात चौपाळे येथील वेदमुर्ती रविंद्रजी महाराज यांचा रात्री 8 वाजता कथा श्रवणाचा कार्यक्रम झाला. तर रात्री 12 श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात ज्येष्ठ नेते हिरालालकाका चौधरी, आ.चंदक्रांत रघुवंशी, आ.शिरीषदादा चौधरी, खंडूआप्पा चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.