जयपूर: कॉंग्रेस नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी करत कॉंग्रेससह अशोक गेहलोत यांना अडचणीत आणले होते. यावरून कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांना उपमुख्यमंत्री पदासहित प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले आहे. दरम्यान आता कॉंग्रेसने त्यांना नोटीस पाठविली असून दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केले जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.
“सचिन पायलट आणि इतर १८ सदस्यांना विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. जर त्यांनी दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर विधिमंडळ, पक्षातून सदस्यत्व रद्द करण्यात येईल असे अविनाश पांडे यांनी सांगितले आहे.