नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलतात असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दिल्लीत उपोषण करत आहेत. काँग्रेसने पाठिंबा दर्शवला असून राहुल गांधी यांनी उपोषणस्थळी जाऊन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत आहे. फक्त काही महिनेच बाकी आहेत, विरोधक त्यांना आपली ताकद दाखवून देतील असेही यावेळी राहुल गांधींनी सांगितले. यावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा राफेलचा उल्लेख करत आंध्र प्रदेशातील लोकांचे पैसे अनिल अंबानींना देण्यात आले असा आरोप करत चौकीदार चोर है चा नारा लगावला.