कॉंग्रेसचा जाहीरनामा नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढविणारा: मोदी

0

कोरबा:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील कोरबामध्ये आज झालेल्या निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस जोरदार टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमुळे नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळेच नक्षलवादी हल्ले होत आहेत, असा आरोप मोदींनी केला.

काँग्रेस पक्षाचे लोक नक्षलवाद्यांना क्रांतिकारक म्हणत होते. विधानसभा निवडणुकांवेळी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे जनतेचं लक्ष वेधलं होतं, असं ते म्हणाले. नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेले भाजप नेते भीमा मांडवी यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झालेल्या परिसरात हा हल्ला झाला आहे, हे दुर्दैवी आहे. हे हल्ले का झाले? असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसला जबाबदार धरले. छत्तीसगड राज्याला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट आखला जात आहे, असा आरोप करत आमचं सरकार आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं.