कॉंग्रेसचे सर्व आरोप चुकीचे, कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत-अनिल अंबानी

0

मुंबई- राफेल विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. राफेल करारावरुन विरोधक सरकारवर टीका करत होते, त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अत्यंत मोठा दिलासा मानला जात आहे. या घोटाळ्यात वारंवार उद्योजक अनिल अंबानी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अनिल अंबानी यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत निर्णयाचे स्वागत केले आहे.

काँग्रेसने लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेची काळजी घेणे आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी अंबानी म्हणाले.

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आरोप आहे. ‘राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील सरकारी कंपनी ‘एचएएल’ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केले गेले’ असा राहुल गांधींचा आरोप आहे.