नवी दिल्ली-केंद्र सरकारने साडेचार वर्षाच्या कामगिरीत महत्त्वाचा असा ट्रिपल तलाख पद्धत रद्द करण्याबाबत विधेयक आणले आहे. मात्र कॉंग्रेसकडून याला विरोध होत आहे. कॉंग्रेसने कधीही मुस्लिम महिलांना सन्मान आणि आदर दिला नाही असे आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. अमित शहा आज मध्यप्रदेशात होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर आरोप केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक विचारपूर्वक आणले आहे. यात काहीही दोष नाही. मात्र कॉंग्रेस मतांचे राजकारण करत असल्याचे आरोप शहा यांनी केले.