जयपूर-मध्य प्रदेशमध्ये विधानसभा मतमोजणी सुरु आहे. सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसू शकतो. कारण येथे कॉंग्रेस भक्कम आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस ११४ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप १०४ जागांवर पुढे आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस मध्य प्रदेशमध्ये बहुमत मिळवून सत्ता स्थापन करेल असा दावा केला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या चिन्ह स्पष्ट नाही, मात्र कॉंग्रेस सरकार स्थापन करेल असे सिंधिया यांनी सांगितले.