VIDEO: कॉंग्रेसला स्वदेशी गांधींची आवश्यकता; उमा भारतींचा खोचक टोला

0

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षपद बदलण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या पत्रावरून सोनिया गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र यावेळी कॉंग्रेसमध्ये मतभेद दिसून आले. कॉंग्रेसमध्ये दोन गट तयार असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. एका गटाकडून गांधी घराण्याचीच व्यक्ती अध्यक्ष व्हावे अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष व्हावेत अशी मागणी होत आहे. दरम्यान यावरून कॉंग्रेस विरोधकांनी चांगलाच चिमटा घेत आहे. माजी मंत्री भाजप नेत्या उमा भारती यांनी कॉंग्रेसमधील मतभेदावर प्रतिक्रिया दिली आहे.

गांधी-नेहरू घराण्याचे अस्तित्व संपले आहे. कॉंग्रेस संपली, फार-फार कॉंग्रेस विरोधी पक्षात राहील. कॉंग्रेसला स्वदेशी गांधीची आवश्यकता आहे. विदेशी गांधीमुळे कॉंग्रेसची वाईट अवस्था झाली आहे. स्वदेशी गांधीच्या विचाराच्या नेत्यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व करावे असा सल्लाही उमा भारती यांनी दिला आहे.