कॉंग्रेस आणि विरोधकांचा शेतकरी प्रेम बेगडी आणि लबाड: फडणवीस

0

नागपूर: केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विषयक विधेयकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. मात्र कॉंग्रेससह काही विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. मात्र हा विरोध केवळ बेगडी आणि लबाड आहे असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॉंग्रेसने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात या विधेयकांचे आश्वासन दिले आहे, ते मोदी सरकारने पूर्ण केले आहे. यावरून कॉंग्रेसचा बेगडीपणा उघड होतो असा आरोपही त्यांनी केला आहे.

कॉंग्रेस आणि विरोधकांचा शेतकरी प्रेम हा सपशेल खोटा आहे असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारने मंजूर केलेले बिल शेतकऱ्यांना समृद्ध करणारे आहे मात्र शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविले जात आहे असे त्यांनी सांगितले.