कॉंग्रेस देशाला कमजोर करणाऱ्या ताकतीसोबत-मोदी

0

लखनौ-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच सोनिया गांधी यांच्या मतदार संघ असलेल्या रायबरेलीत आहेत. यावेळी ते जनसभेला संबोधित करत आहे. सभेत त्यांनी कॉंग्रेसला धारेवर धरले.

रेल्वे कोच फैक्ट्रीच्या आधारावर त्यांनी मागील सरकारवर निशाना साधला. मागील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाही असे आरोप मोदींनी केले.

राफेलचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी कॉंग्रेस तोंडावर पडल्याचे सांगितले. कॉंग्रेस देशविरोधी कारवाईला खतपाणी घालणारा पक्ष असल्याचे सांगितले. कॉंग्रेस देशविरोधी ताकती मागे उभी असून सरकार त्यांचा उद्देश सफल होऊ देणार नसल्याचे मोदींनी सांगितले.