नवी दिल्ली-सोशल मीडियात आपली मते मांडताना बऱ्याचदा ट्रोल होण्याची भिती असते. सोशल मीडियातून होणाऱ्या या ट्रोलर्सचा अतिरेकी चेहराही समोर येत असून त्यांच्याकडून उघड उघड धमक्या दिल्या जात आहेत. असाच एक प्रकार काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्याबाबतही घडला आहे. चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करु अशा स्वरुपाचे वक्तव्य या ट्रोलरने त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना केले आहे.
Ma'am @priyankac19 take legal action against @GirishK1605. pic.twitter.com/VvUv4nu8sR
— History of India (@RealHistoryPic) July 1, 2018
भगवान राम के नाम से ट्विटर हैंडल चलाकर, पहले तो मेरा गलत बयान लगाते हो, फिर मेरी बेटी के बारे में अभद्र टिप्पणी करते हो। कुछ शर्म हो तो चुल्लू भर पानी में डूब मरो वरना भगवान राम ही इसका सबक सिखाएंगे तुम जैसे नीच सोच वाले इंसान को।
cc @MumbaiPolice please take action. https://t.co/Ujs7wLia9v— Priyanka Chaturvedi (@priyankac19) July 1, 2018
@girishk1605 या ट्विटर हँडलवरुन चतुर्वेदी यांना ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याच्या ट्विटर अकाऊंटचे नाव ‘जय श्री राम’ असे होते. याप्रकरणी चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोशल माध्यमांतून अशा प्रकारे उघडपणे धमक्या देण्यात येत असल्याने या देशात आपली मुले कशी सुरक्षित असतील. अशा आरोपींना लवकरात लवकर अटक व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया एकाने ट्विटरवरून दिली आहे.
गेल्या काही वर्षांत महिलांना ऑनलाईन माध्यमातून बलात्काराच्या धमक्या देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्यांना अशा धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. नुकतेच राणा आयुब यांना अनेकदा ऑनलाइन माध्यमातून जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. उजव्या गटांकडून त्यांना अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत.
सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी चुकीच्या भाषेत ट्रोल करण्यात आले. यावर त्यांनी लोकांची मते जाणण्यासाठी थेट पोल घेतला आणि लोकांना आपले मत देण्याचे आवाहन केले. यावर स्वराज यांच्याविरोधात ४३ टक्के मते पडली तर ५७ टक्के लोकांनी त्यांना पाठींबा दर्शवला. नुकतेच थॉमसन राउटर्स फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात महिलांच्या सुरक्षेबाबत भारत अधिक धोकादायक देश असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भारतात महिलांबाबत उघडपणे होत असलेल्या टीका टिपण्णीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे ठरले आहे.