मुंबई: सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अधिक वेगवान आहे. महाशिवआघाडीचे सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्ता स्थापनेसाठी तयार झालेल्या फॉर्म्युलाबाबत माहिती दिली जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आघाडीची ही बैठक सुरु आहे. यात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वड्डेटीवार, नितीन राऊत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील ,अजित पवार , छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील , हेमंत टकले, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, रिपाई कवाडे गट जोगेंद्र कवाडे, शेतकरी संघटना राजू शेट्टी, अनिल गोटे, शेकाप मिनाक्षीताई पाटील बाळाराम पाटील, धैर्यशील पाटील, सचिन खरात ( रिपाई खरात गट )सुहास बने, जनता दल निरंजन शेट्टी, श्रमिक मुक्ती दल प्रा. एस.व्ही.जाधव शेकाप, ऍड सुरेश माने आदी बैठकीला उपस्थित आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची देखील आज बैठक होणार असून त्यानंतर सत्ता स्थापनेची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे.