कॉपी करतांना पकडला गेल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

0
औरंगाबाद – पेपर कॉपी करतांना पकडला गेल्याने एका नर्सिंगच्या विद्यार्थ्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. एम. आय.टी या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला असून सचिन वाघ (वय-19) असे त्याचे नाव आहे. तो नर्सिंगच्या प्रथम वर्षाला होता. त्याचा आज पहिला पेपर होता.
आजपासून (मंगळवार) न्युट्रीशन बायो केमेस्ट्रीच्या पेपर सुरु होता. त्यात त्याला कॉपी करताना सुपरवायझरने पकडले. त्यानंतर त्याला परीक्षेला बसू न दिल्याने तो बराचवेळ गॅलरीत बसून राहिला. त्यानंतर त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात सचिनला गंभीर जखमी अवस्थेतमध्ये तातडीने कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आले आहे.
सचिनला फी भरु न दिल्याने परीक्षेत बसू दिले नाही, अशी चर्चा सुरु होती. यानंतर सचिनने पूर्ण फी भरली होती, असे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सचिनने उडी मारण्यापूर्वी त्याच्या काही मित्रांना फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.