लॉस एंजेलिस : आजपर्यंत विनोदी भूमिकामुळे ओळखला जाणारा केवीन हर्ट आता गंभीर प्रकारची भूमिका साकारणार आहे. मॅट लोगेलिन यांचे बेस्ट सेलर पुस्तक ‘टू किसेस फॉर मॅडी : ए मेमोयर ऑफ लॉस अँड लव्ह’ यावर आधारित ‘फादरहुड’ हा चित्रपट असेल.
ही एका विधुर व्यक्तीची गोष्ट आहे. त्याची पत्नी मुलाला जन्म दिल्यानंतर बाळंतपणात मृत्यूमुखी पडते. तो जन्मलेल्या मुलाचे संगोपन स्वतः करतो. अशा या बापाची गोष्ट दिग्दर्शक पॉल रिट्झ मोठ्या पडद्यावर मांडणार आहेत.