कॉलेजच्या परीक्षेपूर्वी द्यावी लागणार कोरोनाची परीक्षा; पिंपरी-चिंचवडमधील कॉलेजचे आदेश

0

पिंपरी: कोरोनामुळे यावर्षी सर्वच क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षा होणार की नाही? हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजच्या एका निर्णयामुळे शेकडो विद्यार्थांची चिंता वाढली आहे. कॉलेजने २४ ऑगस्ट रोजी फिजिकल परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. कोरोना चाचणी करण्याचे आदेश डी.वाय.पाटील कॉलेजने दिले आहे.

पुणे मिररच्या वृत्तानुसार, कॉलेजकडून विद्यार्थी पुण्यात आल्यानंतर आणि पुण्यातून बाहेर जाताना कोविड टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. देशातील विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. पुण्याबाहेरील सर्व विद्यार्थी लॉकडाउनमुळे आपापल्या घरी परतले आहेत. सध्या पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परीक्षेसाठी माघारी येण्यावर त्या विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

डी. वाय पाटील डेंटल कॉलेजचे डीन डॉ. डी. गोपाळकृष्ण म्हणाले, ‘आम्ही कोविडचे टास्ट फोर्स तयार केलं आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना(WHO)च्या नियमांनुसार सर्व सोयी सुविधा आणि काळजी घेण्याची तयारी केली आहे. याबाबतचे सर्व ऑनलाइन व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. आम्ही सोशल डिस्टनसिंगचा वापर करुन परीक्षा घेणार आहे. तसेच सर्व विद्यार्थांना करोना चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे.’