कॉलेजमध्ये असतांना म्हणायचो ‘बायको असावी तर अशी’

0

मुंबई-अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर त्यांचे २० वर्षांचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. भलेही आज ही जोडी विभक्त होत असली तरी त्यांची लव्हस्टोरी फारच सुंदर होती. अर्जुनने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा पहिल्यांदा अर्जुन रॅम्पवॉक करणार होता, तेव्हा तो प्रचंड घाबरला होता. त्याने घाबरुन मेहरचा हात घट्ट पकडला होता. जेव्हा अर्जुन त्याच्या करिअरला सुरूवात करत होता तेव्हा मेहर मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये नावाजलेले होती.

१९९८ मध्ये झाले होते लग्न

अर्जुन आणि मेहरची लव्हस्टोरी सांगताना म्हणाला की, ‘जेव्हा मी हॉस्टेलमध्ये राहायचो त्या रुममध्ये मेहरचे पोस्टर होते. ते पोस्टर पाहून मी नेहमी बोलायचो की, बायको असावी तर अशी.’ अर्जुनची ही इच्छा पुढे जाऊन पूर्ण झाली त्याने हॉस्टेलच्या पोस्टर गर्लशी अर्थात सुपरमॉडेलशी लग्न केले. मेहर माजी मिस इंडिया आहे. फेमिना मिस इंडिया झाल्यानंतर मेहरने मॉडेलिंगमध्ये करिअर करायला सुरूवात केली. अर्जुनने १९९८ मध्ये मेहरशी लग्न केले. अर्जुन आणि मेहर यांना मायरा आणि महिका या दोन मुली आहेत. अर्जुनने मेहरसाठी खास एक पेंटहाउसही खरेदी केला होता.