पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे आज ४.४५ वाजेच्या सुमारास पुण्यात निधन झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक वेळ पार्थिव शरीर ठेवता येणार नसल्याने ते घरी न नेता, आजच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.