ठाणे : दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ अशा विस्तीर्ण परिसरात राहणार्या हजारो कोकणवासीयांना लवकरच खुषखबर मिळणार असून कोकणात जाणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा, हे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याबाबत करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाड्यांना लवकरच थांबा देण्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी खा. डॉ. शिंदे यांना दिली. नियमित धावणार्या गाड्यांबरोबरच गणेशोत्सवात सोडणार्या येणार्या विशेष गाड्यांनाही दिवा स्थानकात थांब देण्याची तयारी प्रभू यांनी दर्शवली.
दिवा स्थानकात कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी खा. डॉ. शिंदे गेली तीन वर्षे प्रयत्नशील होते. बुधवारी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रवाशांची होणारी अडचण त्यांच्या निदर्शनास आणली. तसेच, गणेशोत्सवातही लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणांहून सोडण्यात येणार्या विशेष गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा, यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाड्यांना तसेच गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्या विशेष गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची ग्वाही श्री. प्रभू यांनी दिली.
सुपरफास्ट, विशेष गाड्यांना थांबा
दिवा-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या दोन पॅसेंजर वगळता लांब पल्ल्याची एकही गाडी दिवा स्थानकात थांबत नाही. दिवसभरात नेत्रावती, कोकणकन्या, मांडवी, मंगलोर, मत्स्यगंधा, जनशताब्दी आदी गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. आता तांत्रिक बाबी तपासून या गाड्यादेखिल दिवा स्थानकावर थांबणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एसटी