कोकरू वाचवण्याच्या प्रयत्नात काका-पुतण्याचा मृत्यू ; चिंचगव्हाण नजीकची घटना

0

मृतात 14 वर्षीय बालकाचा समावेश ; तलावातील खोल खड्ड्यामुळे घटना

चाळीसगाव- तालुक्यातील चिंचगव्हाण गावालगतच्या सुंदरनगर तांड्याजवळील पाझर तलावात कोकरू वाचवण्याच्या प्रयत्नात काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. बाळू गोविंदा ठोंबरे (वय 37) व युवराज शांताराम ठोंबरे (वय 14, रा. गाळणे, ता. मालेगाव) अशी मृतांची नावे आहेत. बाळू ठोंबरे व युवराज ठोंबरे हे दोघंही काका-पुतणे दोन दिवसांपूर्वी चिंचगव्हाण येथे मेंढ्या चारण्यासाठी आले होते. पाझर तलावाच्या किनारी हिरवळ असल्याने त्या परीसरात ते शनिवारी मेंढ्या चारत असताना मेंढीचे एक कोकरू हे पाण्यात पडल्याने त्याला पाण्यातून काढण्यासाठी युवराज ठोंबरे हा पाझर तलावात उतरला. कोकरूला बाहेर काढत असताना तलावातील खोल खड्यांचा अंदाज न आल्याने तो तेथील गाळात फसून बुडू लागला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याच्या सोबत असलेले त्याचे काका बाळू ठोंबरे यांनी पाझर तलावात उडी घेतली मात्र त्यांचाही मृत्यू झाला.