रावेर– तालुक्यातील कोचूर बु.॥ ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र महाजन यांच्याविरुध्द ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडे सादर केले. सरपंच महाजन हे गावातील प्राथमिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात, सदस्यांना विस्वासात न घेता मनमानी कारभार करतात, सदस्यांना ग्रामपंचायत कामकाज व व्यवहारापासून लांब ठेवतात आदी कारणे देऊन अविश्वास दाखल करण्यात आला. प्रस्तावावर उपसरपंच संगीता आढाळे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर येवले, भूषण येवले, कांतीलाल कोळी, ललिता पाटील, पुष्पा राऊत यांच्या सह्या आहेत. नऊ सदस्यां पैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदारांकडे सादर केला असून त्यावर 16 रोजी विशेष सभेत निर्णय होणार आहे.