भुसावळ- शहरातील नामांकीत प.क.कोटेचा महिला महाविद्यालराच्या प्रोफेसरपदी डॉ.शुभांगी दिनेश राठी यांची अखेर वर्णी लागली आहे. खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे प्रा.राठी यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्रांचा एनमुक्टो शाखेतर्फे सत्कारही करण्रात आला आहे.
असे आहे नेमके प्रकरण
तब्बल 31 वर्षांपासून ज्ञानार्जनाचे धडे देणार्या प्रा.डॉ.राठी या कोटेचा महाविद्यालयात कार्यरत असून सहाव्या वेतन आयोगाच्या निर्णयानुसार महाविद्यालयात प्रोफेसर पदाची तरतूद करण्यात आली होती. शैक्षणिक व संशोधक गुणवत्तेच्या आधारावर त्यांना हे पद देण्यात आले होते. प्रा.डॉ.राठी यांची गुणवत्ता तपासल्यानंतर विद्यापीठाने त्यांना 27 जानेवारी 2014 रोजी त्या या पदाबाबत पात्र असल्याचे पत्र दिले होते. यानंतर पदोन्नतीबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे त्यांनी अनेकदा विनंतीही केली मात्र दखल न घेण्यात आल्याने त्यांनी खंडपीठात दाद मागितली. महाविद्यालय प्रशासनाने या संदर्भात तीन महिन्यात दखल घेण्याचे सांगितल्यानंतर 26 एप्रिल 17 रोजी ही याचिका निकाली निघाली. त्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने दखल न घेतल्याने खंडपीठाचा अवमान झाल्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती व त्याबाबत खंडपीठाने 28 फेबु्रवारी 18 रोजी प्रा.राठी यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर विद्यापीठाने सकारात्मक भूमिका घेत महाविद्यालयात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याने महाविद्यालयाने नमती भूमिका घेत प्रा.डॉ.राठी यांना प्रोफेसर पद देण्याबाबत निर्णय घेतला. प्रा.राठी या भुसावळातील नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांच्या सुविद्य पत्नी आहेत तर त्या उमविच्या राज्यशास्त्र मंडळाच्या माजी सदस्य असून दहावी-बारावी बोर्डाच्या सदस्यादेखील आहेत.