मुंबई – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे . संविधानाकारांनी संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे . मात्र संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही . त्यामुळे सरकार कुणाचेही असो संविधान कदापि बदलले जाणार नाही जे सरकार संविधानाला हात लावेल त्यास आंबेडकरी जनता सत्तेतून हद्दपार करते . मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार संविधानाचा गौरव करणारे असून दलित आदिवासींच्या आरक्षणाला संरक्षण देणारे सरकार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी येथे केले . घटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर गोळीबारकांडातील शहिदांच्या 20 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत ना आठवले बोलत होते . विचारमंचावर रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे काकासाहेब खांबाळकर गौतम सोनवणे श्रीकांत भालेराव आशाताई लांडगे शाहीर प्रतपसिंग बोदडे सिद्धार्थ कासारे हेमंत रणपिसे डॉ हरीश अहिरे डी एम चव्हाण नैनाताई वैराट गायिका कविता पुणेकर बाळासाहेब गरुड कैलास बर्वे रवी नेटवटे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते .
दलित अत्याचारविरुद्ध लढणारे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेसाठीं लढताना छातीवर पोलिसी गोळ्या झेलण्याची हिम्मत असणारे लाखो तरुण भिमसैनिक आंबेडकरी चळवळीत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले .