कोथळीचे बौलशौर्य अखेर परतले, मुलाला पाहताच मातेने मिरली मिठी

0
मुक्ताईनगर :- तब्बल नऊ महिन्यांपासून घरातून बेपत्ता झालेला बालशौर्यपुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल  गौरकपुर येथे सापडला असुन कायदेशिर प्रक्रिया करुन मुक्ताईनगर पोलासासह आज मुक्ताईनगरात आले.
गोरखपूरच्या स्नेहालयमध्ये असल्याची वार्ता कळताच नीलेशचे वडील रेवाराम भिल्ल व मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगरचे एएसआय माणिक निकम व कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे हे गोरखपूर न्यायालयात नीलेशचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. कायदेशीर कारवाही र्पुू करत 6 रोजी निलेशसह पथक मुक्ताईनगरात दाखल झाले. निलेशला पाहताच त्याची आई सुंदराबाईने मुलाला मिठी मारत आसवांना मोकळी वाट करून दिली.