कोथळीत कोरोनाचा रुग्ण आढळला

मुक्ताईनगर : तालुक्यातील कोथळी येथील 35 वर्षीय युवकाची सोमवारी कोरोना अ‍ॅन्टीजन चाचणी पॉझीटीव्ह आली. गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होती परंतु सोमवारी कोथळी येथे आढळलेल्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाला जळगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.योगेश राणे यांनी दिली.