कोथळीत माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी केली फवारणी

0

मुक्ताईनगर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव गावात होऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी स्वत: ट्रॅक्टर चालवत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या कोथळी या गावात निजंर्तुकीकरणासाठी फवारणी केली. कोथळी ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरवरून ही फवारणी करताना स्वत: एकनाथराव खडसे यांनी ट्रॅक्टर चालवले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, कोथळीचे पोलीस पाटील संजय चौधरी, ग्रामसेवक रोकडे, वैद्यकीय विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.