कोनिका मिनोल्टाकडून भारतात अॅक्युरिओजेट केएम-१ प्रिंटरचे अनावरण

0

मुंबई :- देशाच्या प्रिंट आणि प्रिंटिंग उद्योगात एक क्रांतीकारक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कोनिका मिनोल्टा बिझनेस सोल्‌यूशन्स या अॅडव्हान्स्ड इमेजिंग आणि नेटवर्किंगच्या क्षेत्रातील जागतिक आघाडीवरच्या कंपनीने अॅक्युरिओजेट केएम-१ प्रिंटर्सचे भारतात अनावरण केले आहे. चेन्नईमधील डिना कलर लॅब्समधील पहिली स्थापना ही संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील पहिल्‌या अॅक्युरिओजेट केएम-१ची पहिली पायरी आहे.

या इन्स्टॉलेशनबाबत बोलताना कोनिका मिनोल्टा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दायसुके मोरी म्हणाले, “एक देश म्हणून भारत डिजिटल फर्स्ट अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाच्या दिशेने वेगाने चालू लागला आहे आणि प्रिंट व प्रिंटिंग उद्योगाला वेगाने बदलणार्‍या बाजाराच्या रचनेमध्ये उत्क्रांत होण्याची गरज आहे. कोनिका मिनोल्टामध्ये आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांचे सबलीकरण त्यांना आवश्यक असलेल्या उपाययोजनांच्या मदतीने करण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यामुळे त्यांना मोठ्या व्यवसायसंधी निर्माण होतील. अॅक्युरिओजेट केएम-१चे डिना कलर लॅब्समधील पहिले अनावरण हे या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.”

“आम्हाला विश्वास आहे की, आमच्या अद्ययावत हायटेक सोल्‌यूशनमुळे डिना कलर लॅब्सना बाजारातील नवीन युगाच्या प्रिंटिंगच्या गरजा पूर्ण करणे आणि प्रिटिंगचे कार्य हाती घेणे शक्य होईल जे पारंपरिक प्रिटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण करणे जवळपास अशक्य होते. डिजिटल हे प्रिंटिंगचे भविष्य आहे आणि अॅक्युरिओजेट केएम-१ स्थापित करून डिना कलर लॅब्सने स्वतःला नवीन डिजिटल क्षेत्रावर आधारित रचनेसाठी तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.”

कोनिका मिनोल्टाचे अद्ययावत अॅक्युरिओजेट केएम-१यूव्ही इंकजेट प्रेस सोल्‌यूशन हे बी२ प्लस शीट फेड इंकजेट प्रेससोबत येते आणि त्यात कंपनीच्या पेटंटप्राप्त यूव्ही इंकजेट तंत्रज्ञानाचा समावेश आहे. सिंप्लेक्स मोडवर ती एका तासात १००० पाने आणि डुप्लेक्स मोडवर १५०० पाने प्रिंट करू शकते. त्याचवेळी स्पेशल डिजिटल स्टॉक किंवा महागड्या कोटिंग वापरण्याची गरजही भासत नाही.