कोम्बिंग ऑपरेशन थांबवा : आंबेडकर

0

कारेगाव भीमा दंगल
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसेनंतर पोलिसांनी सुरू केलेले कोम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरूच असून पोलिसांनी तात्काळ हे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे, अशी मागणी भारिप-बहूजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी ही मागणी केली. हे कोम्बिंग ऑपरेशन थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली होती. त्यांनी ही विनंती मान्यही केली होती. मात्र तरीही अजून कोम्बिंग ऑपरेशन सुरूच असल्याचे आंबेडकर म्हणाले. भीमा-कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक का केली जात नाही? असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे.