दिघी : लघुशंकेसाठी थांबलेल्या मोटार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी त्याच्याकडील दोन लाख रूपये किंमतीची इनोव्हा मोटार पळवून नेली. ही घटना नाशिक फाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सोमेश्वर काकडे (वय 34, रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी मध्यरात्री कासारवाडी, नाशिक फाटा येथे लघुशंकेसाठी थांबले होते. पांढर्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यांची टोयाटो इनोव्हा मोटार पळवून नेली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.