कोयत्याने वार करून पादचा-याला लुटले

0

चिंचवड : बिजलीनगर येथील बसथांब्याजवळून चालत निघालेल्या तरुणावर कोयत्याने वार करून मोबाईल हिसकावून नेला. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेबारा वाजता घडली.

वर्तुल शर्मा (वय 24 रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कोयत्याने शर्मा यांच्या उजव्या पायावर वार करून त्याच्या जवळील मोबाईल व रोख रक्कम असा 5 हजार 170 रुपयांचा ऐवज लुबाडला. असाच प्रकार भोसरी येथे शनिवारी (दि.25) एका ज्येष्ठ नागरिकाची बॅग हिसकावून नेली होती. त्यामुळे शहरात दुचाकीवरून येऊन सामान हिसकावून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.