कोरपावलीच्या तत्कालीन सरपंचांची पोलीस कोठडीत रवानगी

0

यावल- तालुक्यातील कोरपावली येथे 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कोरपावली येथील तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे यांना बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद केला. सविता या आपल्या पतीसह मुंबई येथे पसार होण्याच्या बेतात असताना पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी एसटी बसचा पाठलाग करून त्यांना अटक केली. कोरपावली ग्रामपंचायतीत आठ लाख 46 हजार 500 रूपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे व ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांच्या विरूध्द 20 नोव्हेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल होता.