लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर; 36 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
यावल- बौद्ध पंच मंडळाचा अध्यक्ष का बनू दिले नाही? तसेच पाण्याच्या टाकीजवळील पाईपलाईनवर असलेला व्हॉल्व्ह सुरू का करतो ? या कारणावरून वाद उफाळल्याने तालुक्यातील कोरपावलीत दोन गटात दंगल उसळली. लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आल्याने एका गटातील नऊ तर दुसर्या गटातील सात जण जखमी झाले. या प्रकरणी यावल पोलिसात 36 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा आरोपींची धरपकड सुरू होती.
पहिल्या गटाच्या फिर्यादीवरून 15 जणंविरुद्ध गुन्हा
कोरपावलीच्या ग्रामपंचायत सदस्या पुष्पाबाई रामा भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या अंगणात असताना विलास नारायण भालेराव यास त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळील पाईपलाईनवर असलेला व्हॉल्व्ह तु का सुरू करतो तेव्हा भालेराव यास केलेल्या या प्रश्नावरून वाद वाढला व संशयित आरोपी विलास नारायण अडकमोल, सुनील भास्कर अडकमोल, देविदास नागो तायडे, नारायण हिरामण अडकमोल, संजय केशव अडकमोल, रोहित सुनील अडकमोल, केशव ओंकार अडकमोल, कमलाबाई केशव अडकमोल, इंदुबाई भास्कर अडकमोल, कल्पना सुनील अडकमोल, अरविंद सुनील अडकमोल, नागो दामू तायडे, मनोज तुकाराम अडकमोल, ज्योत्ना केशव अडकमोल व प्रल्हाद सुकदेव अडकमोल यांनी लाठ्या, काठ्या व लोंखडी रॉड व्दारे हल्ला केला. त्यात फिर्यादी पुष्पाबाई सह ज्योत्ना सोनवणे, दयाराम सोनवणे, भागवत भालेराव, सतीश भालेराव, अजय भालेराव, अरविंद भालेराव व शरद भालेराव हे जण जबर जखमी झाले तेव्हा दंगलीसह विविध 11 कलमान्वये वरील 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.
दुसर्या गटानेही दिली फिर्याद
या प्रकरणी नारायण हिरामण अडकमोल (कोरपावली) यांनी या प्रकरणी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अजय भालेराव, पुष्पाबाई भालेराव, दयाराम सोनवणे, ज्योस्त्ना सोनवणे, योगीता तायडे, अरुणा भालेराव, जिजाबाई भालेराव, भरत भालेराव, संजय भालेराव, भागवत भालेराव, प्रवीण भालेराव, छोटी भालेराव, अरुण भालेराव, शरद भालेराव, मीना भालेराव, शुभम भालेराव (सर्व रा.कोरपावली), संगीता तायडे, गौतम तायडे (यावल), बापू गोबा भालेराव (थोरगव्हाण), रेखाबाई सुरेश वाघुदे, बंटी वाघुदे (वडगाव, ता.रावेर) यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता कोरपावली येथे फिर्यादी नारायण अडकमोल यांच्या घरासमोर आरोपी अजय भालेरावने मला बौद्ध पंच मंडळाचा अध्यक्ष का बनू दिले नाही? म्हणत वाद उकरला तर अन्य संशयीतांनी लाठ्या-काठ्या तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली तसेच तक्रारदाराच्या घरातून पाच हजारांची रोकडही लंपास करण्यात आली. एका गटाकडून झालेल्या मारहाणीत नारायण अडकमोल, विशाल अडकमोल, कल्पना अडकमोल, समाधान अडकमोल, सागर अडकमोल, कमल अडकमोल, सिंधूबाई अडकमोल, देवेंद्र तायडे, रोहित अडकमोल आदी जखमी झाले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक अहिरे करीत आहेत.