प्रभाग समिती 2,3,4 च्या सभेत स्वयंसेवी संघटनांच्या सदस्यांची निवड
जळगाव-मनपाच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी 3 स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.प्रभाग समितीमध्ये 20 सदस्यांपैकी केवळ 8 सदस्य सभेला उपस्थित होते.दरम्यान, कोरमअभावी प्रभाग समिती 1 ची सभा तहकूब करण्यात आली. तर उर्वरित प्रभाग 2,3 आणि 4 या समितीवर स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
प्रभाग समिती सदस्य निवडीची सभा स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी व्यासपीठावर उपायुक्त मिनीनाथ दंडवते, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.प्रभाग समिती 1 साठी 12 अर्ज, प्रभाग समिती 2 साठी 12 अर्ज, प्रभाग समिती 3 साठी 5 अर्ज तर प्रभाग समिती 4 साठी 7 अर्ज असे एकूण 36 अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी अर्जाची छानणी करण्यात आली.काही अपूर्ण प्रस्ताव अवैध ठरले.
यांची झाली निवड
प्रभाग समिती 2 मध्ये अनिल जोशी,रमाकांत पाटील,संतोष इंगळे यांची निवड करण्यात आली.सूचक म्हणून चेतन सनकत तर अनुमोदक म्हणून मुकुंदा सोनवणे यांची स्वाक्षरी आहे. प्रभाग समिती 3 मध्ये विठ्ठल पाटील,संजय विसपूते यांची निवड करण्यात आली.सूचक म्हणून राजेंद्र पाटील,अनुमोदक म्हणून अॅड.शुचिता हाडा यांची स्वाक्षरी आहे. प्रभाग समिती 4 मध्ये नितीन इंगळे,सीमा झारे,सागर महाजन यांची निवड करण्यात आली.सूचक म्हणून कुलभूषण पाटील तर अनुमोदक म्हणून शोभा बारी यांची स्वाक्षरी आहे.यावेळी प्रभाग सभापती चंद्रशेखर अत्तरदे, रंजना सोनार, सुरेखा सोनवणे व विजय पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.