कोरोनाचा कहर: एका दिवसात देशभरात साडेसहा हजारापेक्षा अधिक नवीन रुग्ण

0

नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे भारतातही कहर सुरू आहे. भारतात कोरोनाचे सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात देशात 6 हजार 654 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसेच 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल 1 लाख 25 हजार 101 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे.