कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांवर टोळधाडीचे संकट

0

नवापूर: टोळधाड येण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. टोळधाडीचे संकट या बातमीने आदिवासी ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.टोळधाड पडण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रलगतच्या राज्यांमध्ये पोहोचलेली टोळधाड आता आपल्या भागातील शेत शिवारामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सावधानता बाळगण्याचे व उपाययोजना करण्याची गरज आहे.

कोरोना महाविषाणूमुळे दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात शेतकर्‍यांचे आर्थिक गणित मोठ्या प्रमाणावर बिघडल्याने शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत असतानाच शेतकऱ्यावर पुन्हा एक नवे संकट उभे राहिले आहे. मागीलवर्षी काही भागात झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांचे पहिलेच नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही.

मध्यप्रदेश राज्यात शेतांमध्ये टोळधाड नाकतोंडयांचा समूह खान्देशातील शेत शिवारासह आदिवासी क्षेत्रातील भागात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. टोळधाडच्या समूह रात्री ठिकठिकाणी थांबून त्या ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टोळधाड शेतात रात्री मुक्काम प्रसंगी पाचशे ते पंधराशे अंडी जमिनीवर घालते. शेतात असणाऱ्या पिकांचा पाला अथवा रस शोषून ते प्रसार होतात. त्यामुळे पिकांची शक्ती कमी होऊन उत्पादनात घट येण्याची शक्‍यता असते.
शेतांमध्ये सकाळ-सायंकाळी नियमित हजेरी लावत निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. टोळधाडीची चाहूल लागल्यास अथवा दिसल्यास डबे वाजवणे, मोठे आवाज करणे,ट्रॅक्‍टरच्या किंवा मोटरसायकलीच्या सायलेन्सर काढून सुरू ठेवणे, ढोल डीजे वाजवणे तसेच योग्य ते कीटकनाशक वापरणे कीटकनाशक उपलब्ध नसल्यास निव्वळ पाण्याचा जोरदार फवारणी करण्यात यावी. टोळधाडीचे थवेे येताना दिसल्यास मशाली किंवा डबे वाजवून त्यांना जाळावे व आपल्या क्षेत्रातून हाकलून लावावे.

*शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा सुचना*

उभ्या पीकाचा फडशा पाडुन संपुर्ण पिकाचा नायनाट करणाऱ्या टोळधाडीचा प्रादुर्भाव राज्यस्थान, गुजरात मध्यप्रदेश या राज्यात जास्त दिसुन येत आहे. या राज्यालगत जिल्हातही ते येऊ शकतात. तिला अटकाव करण्यासाठी उपाय योजना आखण्याची सुचना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यात नंदुरबार जिल्हात टोळधाडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. या किडीचे थवे तासी १२ ते १६ किमी इतक्या वेगाने उडतात. हे सर्व पीकांचा फडशा पाडतात.

“नवापूर कृषी विभागामार्फेत नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये टोळधाडबद्दल जनजागृती केली जात आहे. टोळधाड आपल्या भागात येण्याची शक्यता कमी आहे. तरी शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.”
– वसंत चौधरी,
तालुका कृषी अधिकारी, नवापूर