कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी शहाद्यात इब्टा संघटनेचे रक्तदान

0

शहादा : सध्या भारतात सुरू असलेल्या कोरोना वायरसच्या थैमानाला रोखण्यासाठी येणाऱ्या काळात रक्ताची गरज भासणार आहे ही बाब ओळखून पुर्व तयारी म्हणून दि.३१मार्च २०२० रोजी शहादा येथील डॉ. बी.डी.पाटील यांच्या रुग्णालयात इब्टा शिक्षक संघटनेमार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराची संपूर्ण काळजी डॉ. नाजिम व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली .रूग्णालयातील एक रुम संपूर्ण आयसोलेट करण्यात आला. कोरोनाच्या धर्तीवर खबरदारी म्हणून दर अर्ध्या तासानंतर दोन दात्यांनी रक्तदान केले. इब्टा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दादाभाई पिंपळे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी एकूण तीस शिक्षक व शिक्षकपाल्यांनी आजच्या दिवशी निर्धारित वेळेत रक्तदान केले.

रक्तदान प्रंसगी शहादा येथील प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे सपत्नीक , तसेच शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी सी गोसावी ,धडगाव तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेश सावळे, शहादा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे उपस्थित होते. राष्ट्र संकटात असतांना आपण देशासाठी काही तरी करावे यासाठी शहादा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर यांनी याकामी इब्टा संघटनेला सहकार्य केले. व सँनेटायझर ,मास्क खबरदारी म्हणून पुरविण्यात आले.

वेळेचे बंधन म्हणून उद्या दि १ एप्रिल रोजी ही ज्यांना रक्तदान करायची इच्छा असेल त्यांनी येथील रूग्णालयात रक्तदान करण्यास हरकत नाही असे संघटनेमार्फत आवाहन करण्यात आले. या शिबीरास यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा संघटक किशोर मगरे, इब्टाचे जिल्हा महासचिव बलवंत देवरे, शहादा तालुका अध्यक्ष प्रविणकुमार देसले,तसेच इब्टाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सोनवणे, लखनसिंग खर्डे, प्रुथ्वीराज राजपूत, तुकाराम धनगर, करणसिंग तडवी यांनी प्रयत्न केले. या सर्व रक्तदान करणाऱ्या दात्यांना एनर्जी ड्रिंक्स व फलोहार इब्टाच्या महिला संघटक सरला पेंढारकर यांच्याकडून देण्यात आला.