कोरोनाने मृत्यू पावलेल्या खाजगी शिक्षक-शिक्षकांच्या कर्मचार्यांची परवड थांबवा
कर्मचार्यांच्या कुटुंबियांना तत्काळ सानुग्रह अनुदान प्राप्त करण्याची कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेची मागणी
भुसावळ : कोरोनामुळे निधन पावलेल्या खाजगी शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा अकाली मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ सानुग्रह अनुदान प्राप्त करून त्यांच्या परीवाराची आर्थिक परवड थांबवावी, कर्मचारी जर पेन्शन प्रस्तावाच्या नियमात बसत असतील तर त्यांची पेन्शन तात्काळ मंजूर करावी तसेच ग्रॅज्युटी तात्काळ अदा करावी व महालेखा धिकारी कार्यालयाने कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचार्यांचा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करून पेन्शन लवकरात लवकर सुरू होईल याविषयी शासन स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिक्षण आयुक्त, महालेखा अधिकारी, जिल्हाधिकारी आदींकडे केली आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनाचा आशय असा की, जे कर्मचारी पेन्शनच्या नियमावलीत बसत नसतील, डी.सी.पी.एस. धारक/एन.पी.एस. धारक तसेच जे कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर सेवेत काम करीत आहेत अशा कर्मचार्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने तत्काळ सानुग्रह अनुदान उपलब्ध करून द्याव, अशी आग्रही मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सरचिटणीस प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.पी.पी.पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.राजेश बडगुजर, प्रा.जी.एच.वंजारी, प्रा.शरद पाटील, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.अतुल इंगळे, प्रा.राजेश भटनागर, सहसचिव प्रा.डी.डी.भोसले, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.डी.जे.चिकटे, प्रा.शैलेश पाटील, कोषाध्यक्ष प्रा.सुधाकर गोसावी, प्रा.बी.एस.बोरसे, प्रा.आर.आर.उपाध्ये, कार्यकारीणी सदस्य प्रा.संदीप पाटील, प्रा.अरुण राठोड, प्रा.एस.एच.चौधरी, प्रा.संदीप पाटील (पारोळा), प्रा.देवेंद्र वानखेडे, प्र.धनराज भारुडे, प्रा.एस.झेड.पाटील, प्रा.किरण कुलकर्णी, प्रा.नरेंद्र गायकवाड, प्रा.अनिल सोनवणे तसेच महिला प्रतिनिधी प्रा.स्मिता जयकर, प्रा.रेखा पवार, प्रा.मनीषा देशमुख, प्रा.भारती महाजन व क्रीडा प्रतिनिधी प्रा.राजेश अंजाळे व प्रा.मनोज वारके आदींच्या स्वाक्षर्या आहेत.