युवा सेना शहरप्रमुख सुरज पाटील यांची मागणी : थेट चतुर्थ वर्षात द्यावा प्रवेश
भुसावळ : देशात व राज्यात कोरोना महामारीच्या संसर्गाने थैमान घातले असून शासनाने या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात 21 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे राज्यातील व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एप्रिल 2020 मधे होणार्या परीक्षांचे नियोजनावर याचा परीणाम झाला आहे. यास्तव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने चार वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रथम, द्वितीय, व तृतीय वर्षाच्या परीक्षामधुन सुट देवून थेट चतुर्थ वर्षास प्रवेश निश्चित करावा व सध्यास्थित चतुर्थ वर्षाला असणार्या विद्यार्थ्यांचे पेपर पुढे ढकलून परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी भुसावळ युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थी मानसिकतेचा व्हावा विचार
सुरज पाटील म्हणाले की, विद्यापीठावर आलेला नैसर्गिक संकटाचा ताण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, मानसिकता आणि विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे पुढील वार्षिक शैक्षणिक नियोजन याचा विचार करावा, प्रत्येक विद्याशाखेतील शेवटच्या वर्षाची वेळापत्रकात बदल करून, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठीच्या परीक्षा रद्द करून सरसकट कॅरीऑन दिल्यास विद्यार्थी, विद्यापीठ, महाविद्यालये व कर्मचारी यांच्यावरील कोरोनाच्या महामारीचमहामारीचा धसका व परीक्षांचा ताणतणाव कमी करण्यास मदत होईल, असे निवेदनाद्वारे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, कवियत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांना केली आहे.