शहरात कोरोना रुग्णांची संख्या झाली दोन : नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन
भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळातील समता नगर परीसरात वास्तव्यास असलेल्या 43 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याची घटना ताजी असतानाच जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परीसरातील एका रुग्णाचा रविवारी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने भुसावळकरांच्या उरात धडकी भरली आहे. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत रुग्ण राहत असलेल्या परीसरात सॅनिटायजेशनसह हा परीसर सील करण्यासंदर्भात कारवाईला वेग आला तर आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना जळगावात हलवण्याची प्रक्रिया केली जात असल्याचे सांगण्यात आले.
भुसावळात कोरोनाबाधीतांची संख्या झाली दोन
भुसावळातील समता नगर भागातील 43 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर शहरात खळबब्ळ उडाली होती. या महिलेच्या पतीसह मुलाला तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना जळगावात तपासणीसाठी हलवले होते शिवाय हा परीसर पूर्णपणे सील केला होता. दरम्यान, शहरातील एका एम.डी.डॉक्टरांसह अन्य एका डॉक्टरांकडे या महिलेने उपचार घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य विभागाने या संदर्भात चौकशी केली. उपचार करणार्या एम.डी.डॉक्टरांनी पीपीई कीट परीधान केल्याची माहिती असून काही कर्मचार्यांना मात्र जळगावात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भुसावळातील सिंधी कॉलनी परीसर सील होणार
जामनेर रोडवरील गजबजलेल्या सिंधी कॉलनी परीसराील एका रुग्णाचा पॉझिटीव्ह अहवाल आल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी भुसावळात धडकताच शहरात प्रचंड खळबळ उडाली. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, डीवायएसपी गजानन राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर आदींच्या उपस्थितीत रात्री सिंधी कॉलनी परीसरात राबवण्यात येणार्या उपाययोजनांबाबत बैठक होणार आहे तर उभय अधिकारी रात्रीच या भागात भेटीसाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागातर्फे या भागात रुग्ण राहत असलेल्या परीसरात सॅनिटायजेशन तसेच घरांचा सर्वे करून फार्म भरून घेतले जाणार आहेत.