कोरोना योद्धांना भारतीय सैन्य दलाची मानवंदना: आकाशातून पुष्पवृष्टी

0

मुंबई: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी नित्य आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धा आहेत. दरम्यान त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण भारतात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना योद्धांचा सन्मान केला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय सैन्य दलाचे विशेष विमाने पुष्पवृष्टी करत आहे. मुंबईतील कस्तुरबा आणि जे.जे.रुग्णालयावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा मनोधैर्य वाढवा भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला आहे. लॉकडाऊनच्या काळात शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती देखील कमी आहे. मात्र पोलीस, आरोग्य आणि सफाई कर्मचारी आपली सेवा देत आहे.