कोरोना रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही:अजित पवार

0

पुणे:- देशासह राज्यात राज कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाखाच्या पार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर असून, रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आले होती.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव टाळणे आणि अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी करोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसत असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.