जळगाव। कोरोना या विषाणूने जगाला हादरुन सोडले आहे. आज आपला देश लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. तरी अजुन पण लोकांना कोरोनापासून बचावासाठी काय दक्षता घ्यावी हे समजत नाही. याच पार्श्वभूमीवर आधारित आणि एक सामाजिक जनजागृती म्हणून प्रगती शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी कोरोना विषाणुविषयी आपण काय दक्षता घ्यायला हवी यावर आधारित स्वरचित एक गीत लिहून व स्वतः गायन करुन यू ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सऍपच्या विविध ग्रुप शेयर करून ‘अब घर में ही रहेंगे हम, कोरोना से अपने देश को बचायेंगे हम’ असा संदेश दिला आहे. यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.